कालाय तस्मय नमः

Started by amoul, January 02, 2013, 11:22:11 PM

Previous topic - Next topic

amoul

रक्तावर दावे अनेक इथे.
कलम होतो तो हात हरेक,
जो अन्यायाच्या विरोधात उठे.
किसकी बतोपर  करे यकीन,
हर कसम जुठी, हर वादे जुठे.

आपस्वार्थाने जो वागे कुणी,
लक्ष्मी भरी पाणी त्यांच्या घरी.
सत्याने इमानाने जो वागे,
राहते त्याची भाकर कोरी

वेसन त्या प्रत्येक तोंडावर,
जे सच्चाईचा पाठ पढे.
अमिरांच्या इमाल्यासाठी,
गरिबांच्या स्वप्नांचे मढे.

न्यायही का आंधळ होतो,
डोळे बांधून उभा राहतो.
न्यायदेवता हि स्त्री आहे,
यावर माझा विश्वास नाही,
बलात्कार करणारयांच्या,
गळ्यास अजून फास नाही.

ज्याकडे रक्षणाची किल्ली,
तोच उडावे अब्रूची खिल्ली.

पैसा उडवे जो कोणी,
त्याची येते इथे सत्ता.
नेत्याला विमानाचे पंख,
रक्तात भिजे कार्यकर्ता.
हर नेता देतो एकाच नारा,
जातपात नाहीशी व्हावी,
पण पुढल्या पाचशे वर्षांसाठी,
जातीला आरक्षणाची ग्वाही हवी.

जगण्याची जो आझादी मागे,
तो त्यांना अमान्य होतो.
मग मन मारून जो जगतो,
तो माणूस सामान्य होतो.

महागाईला आली डोकी दहा,
भस्मासुर भयानक झाला.
माणुसकीच्या उरल्या सुरल्या,
विश्वासावर आला घाला.

रोज झोपतांना डोळ्यावर,
आशेचा एक पदर हवा.
बघ येतो का उद्या कुठे,
उजळणारा दिवस नवा.

जगणे हि जुने,मरणे हि जुने,
ते सुखही जुने,ते दुख्ख्ही जुने,
आपल्या माणसांसाठी म्हणून,
काळजाचा हुंकार रुणझुने.

काही बदलणार नाही जरी,
तरी सारे नव्याने पहा.
जसा काल गेला,तसा आजही जाईल,
कालाय तस्मय नमः
कालाय तस्मय नमः

..........अमोल

केदार मेहेंदळे