काळाच्या ओघात

Started by GANESH911, January 03, 2013, 11:58:57 AM

Previous topic - Next topic

GANESH911

शेणामातीच्या अंगणापर्यंत डांबर कधी आलं
समजलच नाही,
सुंदर पानफ़ुलांचं शेवाळं कधी झालं
समजलंच नाही,
पुर्वी अंगणात सारवुन त्यावर रांगोळी सजायची
प्रसन्नता अंगणातुन सर्व घरात उतरायची
दिव्यांचा तो मिणमिणता प्रकाश प्रखर कधी झाला
समजलंच नाही,
चिऊकाऊच्या त्या गोष्टी,पुस्तकांचा तो सुवास
गोष्टींमधलं काही खास, जादुई दुनियेचा आभास
मनाच्या कोन्यात कधी दुरवर फ़ेकलं गेलं
समजलच नाही,
जास्तीचा हव्यास असा नड्ला,माणुस मग एकटा पड्ला
कागदाच्या बद्ल्यात सारं काही कधी विकलं गेलं
समजलच नाही,
सारे कसे बदलुन गेलं,जुनं आता स्वप्न झालं
काळासोबत आयुष्याचं गणित कधी बद्लत गेलं
समजलचं नाही.

                   गणेश शिवदे

केदार मेहेंदळे

khar aahe.... sagal kadhi badalal kalach naahi

GANESH911



GANESH911

mahadev ,tumhala aavadalelee disat nahi ,tumacha smiley VAKULYA dakhavatoy ase vaatate ,taree dhanyawad :P

arundhatigunjkar

GANESH KAVITA KHUP CHHAN KELI VASTAV SARVA SAMOR ANUN MOTIVATE KELES  ALL THE BEST

Madhura Kulkarni

कवितेचा आशय आवडला.

GANESH911