मन

Started by Mangesh Kocharekar, January 04, 2013, 03:04:24 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

 मन
मन वेडे जुमानत नाही तरी मी लढण्यास तयार आहे
तुझी साथ मज लाभणार नाही परी मी खबरदार आहे
    आठव दिवस ते सुखाचे अन दे शपथेवर नकार मजला
   थाबाव धाधड र्हीदयाची अन नजरेस नजर दे माझ्या ,फुला
ठावूक आहे मजल सारे नकार देणे तुज जमणार नाही
अन थ्वूक आहे सत्त्य माझ्या सवे तू फुलणार नाही
     परी स्मरूनी पहा तो बहर एकदा मज वगळणे  जमणार नाही
     त्या बेहोशी अन धुंद क्षणांची  साद तुज ऐकवणार नाही
त्याच पथावरी जाशील तेव्हा आक्रोश यईल तुजला ऐकू
मम भावनांची जिवंत प्रेते पदोपदी तुज पाहतील रोखू
    परी माझी ठावूक आहे अशक्य आहे तुज परतुनी येणे
   आठव मनाशी एकदा तू सर्वस्व मी तुज अर्पिले होते
अन विश्वासुनी तुझ्या निधडेपानावर घरदार मी सोडले होते
जरी दौलत मजला कुणी दावली माघारी मी गेले नसते
    परी अभागी मी ठरले तुला मुळी न ओळखू शकले
    विशावासुनी तव वचनवरती स्वकियांशी दूर लोटले
झिडकारले म्हणुनी न दुख परी भ्र्मार्ता तुझी मला डाचते
  तू सुखी राहावा परी  खोटपण तुझे मला टोचते

                      कोचरेकर मंगेश