अताशा सुखही बोचायला लागलंय...

Started by vaibhav joshi, January 05, 2013, 03:28:10 PM

Previous topic - Next topic

vaibhav joshi


दीर्घकाव्य

अताशा सुखही बोचायला लागलंय...
  फणसाच्या गरात गुंतण्यापेक्षा
मन काट्यांवरच नाचायला लागलंय
अताशा सुखही बोचायला लागलंय...!

सुखाच्या मृगजळामागे धावता धावता
थकलेले माझे मन दुखाच्याच तळ्यात
साचायला लागलंय
अताशा सुखही बोचायला लागलंय...!

कुंतीने देवाकडे दुखच का मागितले
याचा  माग काढता काढता
प्रश्नचिन्हच खचायला लागलंय 
अताशा सुखही बोचायला लागलंय...!

सुख म्हणजे पापण्यांच्या
उघड्झापेच्या निमिष्काला इतकेच अल्पायुषी
हेच नयन द्वय वाचायला लागलंय   
अताशा सुखही बोचायला लागलंय...!

सुख हे तोंडी लावण्यापुरते असते तर
दुख मुख्य न्याहारीसाठी हे आता पचायला लागलंय 
अताशा सुखही बोचायला लागलंय...!

खरे मूलद्रव्य म्हणजे दुखच, त्याचा  एक अलंकार म्हणजे सुख
ते मात्र नथी सारखं नाकात टोचायला लागलय
अताशा सुखही बोचायला लागलंय...!

सुख  माणसाला वाचाळ करत तर  दुख त्याला निशब्द करत
हे मौनच आता मन  वेचायला लागलंय
अताशा सुखही बोचायला लागलंय...!

पळता पळता कळत कि सुख अजूनही लांबच आहे
थकल भागल मन मग 'जवळच्या ' दुखाकडेच पोहचायला लागलंय
अताशा सुखही बोचायला लागलंय...
अताशा सुखही बोचायला लागलंय...!!!

-- वैभव वसंत जोशी , अकोला (ह. मु. पुणे )

केदार मेहेंदळे


chan kavita






दुख्ख हाकेच्या अंतरावर
[/size]अन सुख क्षितिजावर वाटायला लागलय
[/size]पटकन दुख्खाचीच कूस मन आता शोधायला लागलय
[/size]दुख्खच आता आपलंसं वाटायला लागलाय...... 

GANESH911