शेवटचे कधी

Started by GANESH911, January 06, 2013, 07:06:10 PM

Previous topic - Next topic

GANESH911

शेवटचे कधी हसलो मी आता मला आठवत नाही
वेदनेची किंकाळी उठते पण आता मला ती जाणवत नाही
"सोसत नाही आता मला हे"मला असे ही म्हणवत नाही
शेवटचे कधी जगलो मी मला आता आठवत नाही

तुला हरवता हरवता स्वता हरलो मी
आत्मा गेला कधीच शरीर म्हणुन उरलो मी
हार की जीत माझी,माझे मलाच समजत नाही
शेवटचे कधी हरलो मी आता मला आठवत नाही

अश्रु संपतात माझे,पण दु:ख मात्र विरघळत नाही
बोथट का झाल्या भावना काहीच कसे उमजत नाही
शेवटचे कधी रडलो मी आता मला आठवत नाही...


खरंच आता आठवत नाही


-गणेश शिवदे

Ankush S. Navghare, Palghar

Chhan lihiley....
,,,,  mla pan vatatey ki shevatache athavave.
Regards..

GANESH911


Ankush S. Navghare, Palghar


GANESH911

sorry Prajunkush..... :) thanks a lot once again...

केदार मेहेंदळे


GANESH911

dhanyawad kedarji,vait vatun gheu naka ...tumhi hasat rahave yaasathi :D

Preetiii

वेदनेची किंकाळी उठते पण आता मला ती जाणवत नाही
"सोसत नाही आता मला हे"मला असे ही म्हणवत नाही

Chhan ahe khup

GANESH911


swara