भयंकर?

Started by केदार मेहेंदळे, January 07, 2013, 03:41:36 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मागे घडलेल्या प्रसंगा पेक्षा
नवीन घडलेला प्रसंग
जास्त भयंकर वाटतो.
.............................................हे विसरतो आपण की
.............................................मागील वेळेस ही आपण
............................................हेच बोललेलो असतो.

छेडछाड, बलात्कार
............................सामुहिक बलात्कार
.........................................................बलात्कारा नंतर खून.

प्रत्येक वेळेस आपण हादरतो
पशुपणाचा नवीन उच्चांक
माणसांनी मोडलेला असतो

..............................................एक बिंदू पुढे सरकलेला असतो
..............................................मन आपलं आधीकच
..............................................बोथट झालेलं असतं.



केदार..........

amoul

क्या बात है .. केदार.......
तुझी कविता वाचताना बोथट मनालाही धार आलीय.
पण site बंद करेन तेव्हा तेच होईल जे नेमके तू कवितेत मांडले आहेस.

आपण फार स्वार्थी झालो आहोत किंवा स्वार्थी केले गेले आहोत एकूणच परिस्थिती मुळे.

विक्रांत

 :( You are right .very true.

Nand Sadanand

SIR MALA TUMCHYA PEKSHA MOTHA KAVI VHAYCHAY MALA MADAT KARAL?

Mandar Bapat

Hi Paristhiti badlel lawkar...ase mhanat aapn jagat asto..