कसे रामराया

Started by विक्रांत, January 09, 2013, 02:29:09 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

कसे रामराया तुम्हाला पाहावे

गुणांच्या गुढाला कसे आकळावे  || १

कळेना तरी शोधण्या मीच धावे

पडोनी प्रयासी पुन्हा नी झटावे || २

असे का हि क्रीडा कुणाची कळेना

अश्या थोर काजा कुणी का धजेना || ३

कशी भ्रांती कैदाशिणी घोर माया

गुंडाळूनि ठेवे पदासी जगा या  || ४

असे या जगाचे तुम्ही राम स्वामी

तरी का भिकारी तुझे भक्त आम्ही ||५

अहो धाव घाला जना वाचवावे

तुची सांग आम्ही कुणा बोलवावे || ६

पडो देह आता तुला शोधतांना

असे लांछना भोग ते भोगतांना ||७



विक्रांत प्रभाकर

http://kavitesathikavita.blogspot.in/

केदार मेहेंदळे


विक्रांत

धन्यवाद केदार ,भुजंगप्रयात प्रथमच लिहले आहे .

shashaank