लावणी (गुलाबीथंडी पेशल)

Started by shashaank, January 10, 2013, 12:01:56 PM

Previous topic - Next topic

shashaank

लावणी (गुलाबीथंडी पेशल)

राया थंडीत राया थंडीत ऽऽ...
.....घ्या ना मिठ्ठीत मला मिठ्ठीत

फुलला गं काटा थंडीचा ऽऽ...
.....सार्‍या अंगात सार्‍या अंगात

किती उशीरसा केला राया तुमी ऽऽ...
...... अर्ध्या रातीत अर्ध्या रातीत

तुमी बाजीराव, मी मस्तानी ऽऽ...
......दोगं धुंदीत थोडं मस्तीत

उब व्हटांची द्या हो व्हटांना ऽऽ...
.....अंग घुसळीत अंग घुसळीत

हीव जाईल हो हीव जाईल हो ऽऽ...
.....दूर रानात दूर रानात

थंडी गुलाबी रात शराबी ऽऽ...
....नको सपनात, घ्याहो मिठ्ठीत

-पुरंदरे शशांक

केदार मेहेंदळे


shashaank