स्मर्तृगामी प्रभू

Started by विक्रांत, January 10, 2013, 07:46:36 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

काय तुझी देवा|सरली ती दया|मज गरीबा या|लाथाडीसी ||१||
अहो चक्रपाणी|कमंडलू धरा|पदीचा आसरा|द्यावा मज ||१||
नको धन मान|नको यशोगान|पायीचा तो श्वान|करी मज ||१||
बोधिले यदुशी|तैसे अंगीकारा|संसार पसारा|हरवा हा ||१||
स्मर्तृगामी प्रभू|ऐशी तुझी कीर्ती|आणि टाहो किती|फोडावा मी ||१||

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/


केदार मेहेंदळे