बाईपणाच ओझं

Started by SANJAY M NIKUMBH, January 11, 2013, 09:46:23 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

बाईपणाच ओझं

मी बाई आहे म्हणून
तू अबला समजतोस
माझ्या शरीराकडे
फक्त भोग म्हणून बघतोस

माझ्याच पोटी जन्मला तू
हे हि तू विसरतोस
मोठा झाल्यावर पुन्हा
तू माझ्याकडे झेपावतोस

मी कळी असतांनाही
मला कुस्करून टाकतोस
माझ्या साऱ्या भावनांना
तू जाळून टाकतोस

कितीही शिकले सवरले तरी
मला दाबून टाकतोस
फक्त तू पुरुष म्हणून
माझ्यावर मालकी सांगतोस

माझ्या वयाप्रमाणे फक्त
तुझी रूपं बदलतात
बाप , नवरा , मुलगा
नाती फक्त बदलतात

कुठलंही नात असलं तरी
मीच नमतं घ्यावं
कारण फक्त एकच
बाई माझं नावं 

जरी सगळा संसार
मी खांद्यावर घेते
पण बाई असते म्हणून
तुझी दास होते

ओझं वाटतं मला
माझ्या बाईपणाच
फुलेल कां रे नातं
आपल्यात माणूस पणाचं .

                                                संजय एम निकुंभ , वसई
                                     

santoshi.world

chhan ahe kavita ....... manapasun avadali :) ............. keep writing n keep posting...