जीवनांतून निघून गेले ...

Started by Sadhanaa, January 12, 2013, 07:42:04 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

जीवनांतून निघून गेले
            स्वप्नांत आतां येऊ कां ?
कळली चूक माझी मला
असह्य हा विरह जाहला
राहिली जी आंस मनींची
              पुरवून ती घेऊ कां ?
जीवनी भांडले तंटले
सुख ही दिले-घेतले
अनुभविण्या पुन्हां एकदा
             नेत्रीं तुझ्या येऊ कां ?
जीवनाचीं बाग फुलविली
अधुरीच ती सोडून दिली
फुलविण्या बाग ती
            माळीण बनुन  येऊ कां ?
आठव आपुल्या संगतीची
करते तगमग जीवाची
आग ती विझविण्यास्त्व
           शीतल सहवासी येऊ कां ?

रविंद्र बेंद्रे 
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2013/01/blog-post_2.html

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]