सवय

Started by प्रशांत नागरगोजे, January 12, 2013, 11:22:30 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

मलाच सवय वाईट आहे
एकटं एकटं जगण्याची
कुणी दिसलचं एकटं
त्याला साथ देण्याची

मलाच सवय वाईट आहे
निस्वार्थीपणाची
कोणी मागितलचं काही
तर सर्वस्व देण्याची

मलाच सवय वाईट आहे
मनापासून प्रेम करण्याची
मग कोणी तोडलच मन
तर उगाच रडत बसण्याची

मलाच सवय वाईट आहे
अशा सवयी लावायची
कळत असून सर्व काही
तरी असचं वागायची

-आशापुञ

केदार मेहेंदळे



mylife777