देवाकडे पाहू नका

Started by विक्रांत, January 12, 2013, 01:00:25 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

देवाकडे पाहू नका
भाव भोळा आणू नका
व्यवहारात भावनेचा
घोळ उगा घालू नका ll १ ll
देव सदा उभा आहे
पण हाक देवू नका
जन्माची वाट लागेल
भुली त्याच्या पडू नका ll २ ll
हळू तो मनी शिरता   
जग निरर्थ दिसेल 
कमावलेले अवघे
मग नकोसे वाटेल   ill ll ३ ll
माझे जरा नीट ऐका
अशी चूक करू नका
सुखी तुमच्या संसारा
आग उगा लावू नका ll ४ ll
देव छान मंदिरात
वा दिसे देवघरात 
आणताच जीवनात
समजा गेला खड्ड्यात   ll ५ ll
काम धंदा रोजगार 
सारा सुटून जाईन
पैश्यापाण्याविना तुम्हा 
भीक मागणे उरेन ll ६  ll
बायको पोरे मित्रादी
सारी दूर लोटतील 
घेणाऱ्यांच्या जगात या 
तुमचा कोण राहील   ll ७ ll
पूजाअर्चा दानधर्म
कथा व्रते यात्रा करा
वरवर पण जरा
मनी देऊ नका थारा  ll ८ll

विक्रांत प्रभाकर 
http://kavitesathikavita.blogspot.in/

केदार मेहेंदळे

vegalach lihilas




pan dev manat ala tar kaslich fikir rahanar nahi...

विक्रांत

vegalach lihilas
pan dev manat ala tar kaslich fikir rahanar nahi...>>>>>>>ज्यांना देवासाठी दे हवा असतो ,त्यांच्यासाठी नाही हे .

पंढरीचे भूत मोठे। आल्या गेल्या झडपी वाटे।।
बहू खेचरीचे रान। जाता वेडे होय मन।।
तेथे जाऊ नका कोणी। गेले नाही आले परतोनी।।
तुका पंढरीस गेला। पुन्हा जन्मा नाही आला।।

Ram Poul

Shevati Eka Vithalavachun gatyantar nahi na.........!!!!!!

विक्रांत

 ved anant bolila ,arth itukachi sadhila, vithobasi sharan jave.nij nisshta nam ghyave