थोडा break हवाय यार

Started by amoul, January 13, 2013, 12:38:00 PM

Previous topic - Next topic

amoul

थकलोय मी फार,
थोडा break हवाय यार.
धावपळीतून थोडेतरी क्षण विश्रांतीचे चार,
थोडा break हवाय यार.

किती वाटलं ओझं तरीही ते माझंच आहे,
जरी ते माझंच असलं तरी ओझ ते ओझंच आहे.
थोडावेळ तरी उतरवून ठेवू का हा भार ?
थोडा break हवाय यार.

ढिगभराच्या कष्टामधून मुठभरसे सुख्ख हवेय,
घास सुख्खाचा खाण्यासाठी निवांत वेळ कुठेय.
आज थोडं थांबू द्या, उद्या होईन ना मी तयार.
थोडा break हवाय यार.

future च्या plans मुळे present वरच पडलय पाणी,
ambitions चा गळ टाकून बसलाय अदृश्य कोणी.
home loan फेडता फेडता home मधेच alone झालोय.
corporate targets पूर्ण करून emotionless zone झालोय.
before forty सर्व पार करायचय distance is so far.
थोडा break हवाय यार.

कळलच नाही कधी पाउस गेला थंडी आली,
आणि काय काय झाले बदल,
कळलाच नाही कधी झाली आपलेपणाची पानगळ.
गर्दीत ओळखीच्यापैकी कुणालाच ओळखता येत नाही,
तेव्हा raymond चा shirt हि थेंबभराच सुख्ख देत नाही.
कळत नाही कधी झालो इतका परका,
smile च्या formality मुळे प्रत्येकजण दिसतो एक सारखा.
हा status, कि space सबकुच वाटतेय बेकार.
थोडा break हवाय यार.

..........अमोल

केदार मेहेंदळे

khar ahe
chan kavita ani shabd hi chan nivadale ahet

Abhijeet.Kshirsagar

Kharach khup sundar kavita ahe Amol ji shabdanchi rachna pun khup surekh keli ahe........

विक्रांत