शर्मनाक

Started by बाळासाहेब तानवडे, January 14, 2013, 12:45:39 PM

Previous topic - Next topic

बाळासाहेब तानवडे


शर्मनाक

बस नव्हे ती  खुद्द  काळ होता.
वासनांचा  आगडोंब  जाळ होता.
जणु  असुरी शक्तीचा भास होता.
सुटकेचा केविलवाणा ध्यास होता.

आक्रोश आक्रोश निनादत ओसंडले.
अंग-अंग,रंध्र-रंध्र तिचे हो रड-रडले.
दया राहिली दूर दूर अज्ञातवासात.
वासनांनी  पुरे पुरे  थैमान मांडले.

माणुसकीस  काळीमाच  फासला.
विखारी  डंख  मातीसच  डसला.
इज्जतीचा  पुरता  केला फालुदा.
जगण्यावर  सुद्धा  आणली गदा.

अशी शर्मनाक ना कधी घटना घडावी,
जीने  शरमेला  ही  शरम   वाटावी.
पापाच्या  पित्तरालाही   कधी  अशी,
जबर  शिक्षा  म्हणुनही ना मिळावी.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – १४/०१/२०१३

प्रशांत नागरगोजे

khupach vait ghatna hoti ti...

केदार मेहेंदळे

#2
Chan kavita lihilit..........atyant ghrunaspd gosht ghadali aahe....dukhkh vaatun ghenya vyatirikt aapan kahich karu shakat nahi...

बाळासाहेब तानवडे


GANESH911

balasaheb khupach chaan lihilat ,sanvedanshil man asha ghatana lavakar visaru shkat naahee,hyaa kavitebaddal tumhi kautukas patr aahaat,dhanyavad :)

बाळासाहेब तानवडे

खुप धन्यवाद ... गणेश....