दुष्काळ

Started by प्रशांत नागरगोजे, January 14, 2013, 01:59:47 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

(केदारजी तुमच्या हाइकु कविता  वाचून केलेला एक प्रयत्न, कितपत जमला ते कळवा)


पोटापुरतच शिजवा
मोजकच खा
पाहुणा दुष्काळ आहे

तिन परसाची विहीर
शेंदाया बादली अनं दोर
पाणी लपंडाव खेळतय

पान पान कोसळलं
देह काड्यांचा उभा
उन नकोस झालय

जेव्हा पाऊस पडायचा
झाड झाड तोडलं
चुलीत घालायला

आता झाड आठवतय
घरात जीव घामाघुम
जा चुलीत शोधायला

सरकारनं पैसा ओतलाय
ओंजळही भरली नाही
हिवाळ्यातच उन्हाळवास

चिंता उद्याची नाही
प्रश्न आजचा आहे
उत्तरे कालचीच अपुर्ण

पुढच्या पावसाळ्याआधी उठा
अकला विकत घ्या
पाणी वाहून चाललय

पुढच्या पावसाळ्याआधी उठा
एकतरी झाड लावा
पाहूण्याला गाव आवडलाय

-आशापुञ

केदार मेहेंदळे

Prashant

Kavita chan aani arthpurn aahe. Lihinyachi style hi vegali ani chan aahe. Pan mala mahit asaleli haiku mhnaje
'हाइकू' हा एक जापनीज कविता प्रकार आहे. ह्यात प्रत्येक कडवं ३ ओळींचं असतं. प्रत्येक ओळीत कितीही शब्द असू शकता मात्र पहिल्या ओळीत ५, दुसर्या ओळीत ७ आणि तिसर्या ओळीत ५ अक्षरां  पेक्षा जास्त किंवा कमी अक्षरं असू शकत नाहीत. जोडाक्षराला एक अक्षर मानायचं.   (३ ओळयांच  एक कडवं , एकूण अक्षरं १७.) अक्षर संख्या जपण्या साठी शब्द तोडायचा नाही. प्रत्येक ओळ वेगळी असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक ओळीचा अर्थ त्याच ओळीत असायला हवा. ओळ तोडून दोन ओळी करायच्या नाहीत.

pan kavita avadali


प्रशांत नागरगोजे

dhanyavad kedarji, punha try karto...jameparyant...malahi kavita shikayciye....

केदार मेहेंदळे