तू असलीस कि....

Started by रामचंद्र म. पाटील, January 14, 2013, 04:22:32 PM

Previous topic - Next topic

तू असलीस कि मनी एक वेगळाच नाद असतो
गर्दीत हि बाग फुलावी असा प्रेमळ आभास असतो
कटू उन्हातही तुझ्या सावलीत क्षणभंगुर असतो
मनी मात्र तुझ्या आठवणीचा कल्लोळ असतो



तू असलीस कि स्वप्नाची बहर फुललेली असते
मिठीत तुझ्या मझी दुनिया सामावली असते 
नाजाने एक अबोल दुनिया मनी वसलेली असते
क्षणा क्षणाला ओठांवर एक वेगळीच कहाणी असते


तू असलीस कि   दुःख जणू ठेगणे वाटते 
सुखं चार क्षणाचं मज आकाश्पारी वाटते
स्वप्नातले घरटे कळीपारी फुलवावे वाटते
दुरुनी फक्त तुलाच निरखून पाहावे वाटते


तू असलीस कि तुझ्यातच विरघळून जातो
आठवून क्षण विरहाचे क्षणात विसकटून जातो
आपसूक मग मी माझ्यातच हरवून जातो
असून नसलेला मी पुन्हा एकांत शोधत जातो

swara


तू असलीस कि   दुःख जणू ठेगणे वाटते
सुखं चार क्षणाचं मज आकाश्पारी वाटते
स्वप्नातले घरटे कळीपारी फुलवावे वाटते
दुरुनी फक्त तुलाच निरखून पाहावे वाटते


तू असलीस कि तुझ्यातच विरघळून जातो
आठवून क्षण विरहाचे क्षणात विसकटून जातो
आपसूक मग मी माझ्यातच हरवून जातो
असून नसलेला मी पुन्हा एकांत शोधत जातो


khup chan aahe kavita



Samadhan manohar


Akash Bahekar

Kvita apratim aahe....kharach ti asaychi tevha asch hot hot.....

Akash Bahekar



केदार मेहेंदळे

tu asalis ki.......

chaan kavita.... avadali.