"गझिबो"@ इन्फोसिस

Started by प्रशांत नागरगोजे, January 15, 2013, 12:20:37 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

चारी बाजुंना वेळूची झाडं पिवळी हिरवी नटून उभी घोळक्यानं

भोवती वर्तुळाकार भिंत सिमेंटाची समेटून तीने दिलाय सर्वांना पहारा

झुकलेला सुर्य त्याच्या किरणांना झेलताना उठून दिसणारी पिवळी पानं

वार्याच्या लहरीवर धरतीवर नृत्य करणारी वेळूची ती वेडी सावली

मधेच किलबिल एखाद्या पाखराची, फिराया गेलेली ती अजून परतायची

इथे गोंधळ लपलेला शांतता मनसोक्त बागडणारी मन होई समाधिस्थ

निळ्या आकाशा खाली तो चारखांबी कौलारु  निवारा "गझिबो" नावाचा

इथे मी एकटा तरी नसे एकटा सोबती निसर्ग खेळणारा

-आशापुञ

केदार मेहेंदळे