कंटाळा आता तुझ्या आठवणीचा खूप झाला

Started by Mandar Bapat, January 15, 2013, 05:49:54 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

कंटाळा आता तुझ्या आठवणीचा खूप झाला

आठवून बघतो जुना तुझा तो जिव्हाळा....

असावे आरशाप्रमाणे अपुले वागणे

जसे आहे तसेची दावणे

आता डोळ्यांना  आसवाचा पूर  आला

कंटाळा आता तुझ्या आठवणीचा खूप झाला


जरी पालवी मनाची कोमेजलेली

आहेत जरी ती इवली

पानझडीचा हि आता ऋतू वगळला 

कंटाळा आता तुझ्या आठवणीचा खूप झाला


लय  चुकली शब्दांची जरीही

चालीत  आहेत ती तरीही

गाणी रचण्यात असा जीव  रमला

कंटाळा आता तुझ्या आठवणीचा खूप झाला


फोटोत जरी तुला न्याहाळतो मी

जाणूनबुजून तुला टाळतो मी

सांग ना कसा येईल बाबा तुझा  कंटाळा?

तरी म्हणतो मी,कंटाळा आता तुझ्या आठवणीचा खूप झाला

आठवून बघतो जुना तुझा तो जिव्हाळा....

कंटाळा आता तुझ्या आठवणीचा खूप झाला ...


                                                                    ..... मंदार बापट

प्रशांत नागरगोजे

jiv kasavis ala aathavanit tuzya,
meli najar vat pahnyat tuzi,
thakal man aathavanit tuzya,
kantala ala ata aathavanincha khup tuzya

प्रशांत नागरगोजे

#2
sorry,"kantala ata tuzya aathavanincha khup zala"