असतेस घरी तू जेव्हा....!

Started by स्वामीप्रसाद, January 16, 2013, 11:06:24 AM

Previous topic - Next topic

स्वामीप्रसाद

आदरणीय 'संदीप खरे' यांची माफी मागुन सादर करतोय एक विडंबन कविता....

असतेस घरी तू जेव्हा
जीव लटका-लटका होतो
भांडणांचे जडती धागे
अन् सदरा फाटका होतो
असतेस घरी तू जेव्हा....!

नभ फाटुन वीज पड़ावी
हलकल्लोळ तेवढा होतो
मला 'घरा'हीन करते
अन् मम मित्र गुरखा होतो
असतेस घरी तू जेव्हा....!

येतात मुले दाराशी
मार खाऊन जाती मागे
खिडकीशी थबकुन सारा
गावच तुजला पाहतो
असतेस घरी तू जेव्हा....!

तव भीतीत विरघळणा-या
मज स्मरती भयावह वेळा
जखमेवीन अंग सुजावे
मी तसाच भयभीत होतो
असतेस घरी तू जेव्हा....!

तू सांग सखे मज काय
मी देऊ तुला उतारा
माझा जीव उदास
करतो तुझ्या नावे सात-बारा
असतेस घरी तू जेव्हा....!

ना अजुन विटलो तुला
ना अजुन त्रागा करतो
अजुन तुझ्यावर जीव आहे
अन् तुज वाचुन श्वासच अडतो
'नसतेस' घरी तू जेव्हा....!

--स्वामीप्रसाद

GANESH911


स्वामीप्रसाद

खुप खुप  धन्यवाद गणेशजी..!! :) :) :)

केदार मेहेंदळे


स्वामीप्रसाद

खुप खुप धन्यवाद केदारजी :) :) :)

प्रसाद पासे


अक्षरा...


मिलिंद कुंभारे

अन् तुज वाचुन श्वासच अडतो
'नसतेस' घरी तू जेव्हा....!

आवडल्यात!
मिलिंद कुंभारे!  :'( :) ;)

mohan gadadane

ekdaaam zaaaaaaaakaaaaaaaaaas..............khup chhan....excellent..