निरपेक्ष भक्ति

Started by Sadhanaa, January 17, 2013, 10:38:16 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

एकच आहे रीत जगाची
  वाटे न काही त्यांत नवीन
जीवनात जेव्हा येती संकटे
  मनात आठवितो मग भगवान ।
भेटेल का भगवान असा
  मनी राहुनी  सापेक्ष
करावयाला भक्ती हवी 
  सदा सर्वदा निरपेक्ष ।
करत नसाल भक्ती त्याची 
  असाल जेव्हा सुखात
आठवुनि उपयोग नाही 
  पडला जेव्हा संकटात ।
मिळत नाही जागी काही 
  एकाच एका प्रयत्नात
करिता मग अपेक्षा त्याची 
  भक्तीच्या फक्त एक क्षणात ।
जीव जगविण्या लागते जशी 
  उत्कंठा प्राण वायूशी
उत्कट भक्ती असेल तर
  प्रभूच येईल दाराशी ।
आनंद घेता जगती करुनी 
  उघड प्रदर्शन नास्तिकतेचे
घालावी का मग भीड प्रभुशी 
  थोतांड करुनी आस्तिकतेचे
पूजा अर्चा अन भक्ती ढोंगी 
  रुजू न होई प्रभूच्या चरणी
असेल प्रभूचा ध्यास मनी
  ठेवा मनात सात्विक करणी ।                                   
सखे सोयरे अन शेजारी 
  तेथेच प्रभूचा असे वास
उमजून हे गूढ अंतरी
त्याच्या सेवेचा  घ्या ध्यास ।
  करोनी निरपेक्ष पुण्य कर्म 
भजावे प्रभूस एकांतात
  प्रभू दर्शनाचे एकच मर्म 
असे सर्व थोरसांगतात
  करोनी निरपेक्ष पुण्य कर्म
भजावे प्रभूस एकांतात ।।
  रविंद्र बेन्द्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://www.kaviravi.com/2013/01/devotional-poem.html

केदार मेहेंदळे