तुझ्याविना...!

Started by स्वामीप्रसाद, January 18, 2013, 05:21:36 PM

Previous topic - Next topic

स्वामीप्रसाद

हे बंध रेशमाचे आता सैल झाले
ते स्वप्न तुटुन उरल्या फक्त खुणा
वाटे आता हे जग निर्जीव मज
एकटाच उरलो या जगतावर "तुझ्याविना"...!

बहरलेली फुले निस्तेज वाटू लागली
वाराही वाहू लागला तव गंधाविना
वसंतातही सरिता ही सरू लागली
प्रतिबिंब माझे एकटेच तिच्यात "तुझ्याविना"...!

सोडून गेलीस या जिवाला
काय लाभले विचार तुझ्या मना
विटलो पूरा या जीवनाला
बहुतेक मरण माझे आता "तुझ्याविना"...!

--स्वामीप्रसाद


GANESH911


स्वामीप्रसाद

गणेशजी,akshavi मनापासुन धन्यवाद....! :) :) :)


स्वामीप्रसाद

धन्यवाद प्रशांतजी... :)


केदार मेहेंदळे