मला जायचंय बाहेर

Started by Sadhanaa, January 19, 2013, 11:24:25 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

मला जायचंय बाहेर
पण पाउल उचलत नाहीं
घरांत राहिला तसेंच
मन कांही मानत नाहीं ।

मला जायचंय बाहेर
पण रस्ता बंद आहे
घरांत मात्र विरहाशी
सांगड घातली आहे ।

मला जायचंय बाहेर
पण किनारा मिळत नाहीं
घरांत रहाण्यासाठी तसेंच
साथ तीं मिळत नाहीं ।

मला जायचंय बाहेर
पण वाट अंधारी आहे
घरांतही अगदी तसाच
अंधार पसरला आहे ।

बाहेर आणि घरांतही
त्यांत मात्र फरक नाहीं
म्हणूनच बाहेर जाण्यांस
नजाण्यांस उत्तर
            हे मिळत नाही ।। रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_8.html