आनंदाने जगावे

Started by ♥ shashi B Kavita ♥, January 19, 2013, 07:47:48 PM

Previous topic - Next topic

♥ shashi B Kavita ♥

आभाळ जरी कोसळले तरी ,कोणाला न सांगावे !
घरातील कटकटी घरातच निपटावे !
आपले गुपित , दुसऱ्यांना  का सांगावे ?
आपसातील प्रश्न आपसातच सोडवावे !
रक्ताचे नाते हे रक्ताचेच आसवे!
रक्ताच्या नात्याला आपणच का तोडावे ?

ते सत्य कायमस्वरूपी मनात ठेवो !
सर्व कुटुंबाने खाऊन -पिउन गोडी -गुलाबीने राहावे !
जिव्हाळ्याचे गोड शब्द बरोबर ठेवावे !
विनाकारण कटकटी'ने डोके का फिरवावे ?                                           
एपतिप्रमाने खर्च करून गोड स्वप्नात झोपावे !
आपले पाय जेवढे  लांब आहेत तेवढेच अंथरू पसरावे !
दुसऱ्याच्या सुख सुविधा पाहून आपण ईर्षेने का जगावे ?
आपल्या कडे जे काही आहे त्याचातच समाधान मानावे !
समाधान हीच सुखी जीवनाचे किल्ली  आहे हे सत्य कधिच न विसरावे !
स्वत: सुखी राहून इतरांची झोप का उडवावी ?

हे जीवन जगण्यासारखेच आहे !
आनंदाने जगुन  दाखवावे !
नैराश्यला खोल खड्डयात पुरून हसत खेळत जगावे !
डोळे मिटले कि एकटेच जाणार आहेत ,हे सत्य कधी  न  विसरावे !
कोणीही बरोबर येणार नाही हे मनातल्या  मनात समजून घ्यावे !
जिवंत आहेत तो पर्यंत अगदी  नीट प्रेमाने वागावे !
झाले गेले सर्व काही मनापासून विसरावे !

sanjay nalawade

Kavita changli ahe. Sukhi kasa jagave he sangte ani jivanache satya sangte


amoul