देवदूत

Started by देवेंद्र, January 20, 2013, 10:42:45 AM

Previous topic - Next topic

देवेंद्र

जेव्हा खूप खूप वाटूनही
सूर्य मावळतच नाही
भिजून गेलेल्या उशीवर
रात्र संपतच नाही

आठ वांच्या गर्दीत
मन थारयावर नसतं
जुनं तरी किती उगाळायचं
याला उत्तर नसतं

तेव्हा देवदूत बनून कोणी नक्कीच येतं
कारण जगण्याच्या धावपळीत
आपण काहीतरी हक्काचं
नक्कीच मिळवलेलं असतं


GANESH911


amoul


केदार मेहेंदळे