माझी चिंता करु नकोस

Started by प्रशांत नागरगोजे, January 20, 2013, 11:45:50 AM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

माझी चिंता करु नकोस
जीवंत आहे गं मी
फक्त जगत नाहीये
आनंदी पण आहे मी
खुप दु:ख आहे इथे हसवायला

माझी चिंता करु नकोस
एकटा कुठे आहे मी
तुझ्याऐवजी दुनिया आहे ना सतवायला
तुझ्या आठवणी पण आहेत सोबतीला
कधी हसवायला, कधी रडवायला

माझी चिंता करु नकोस
तु नाहियेस आता "वेडा" म्हणायला
तुझ्या आठवणी आहेत ना वेड लावायला
तु परत येणार नाहीस कळतय मला
मग हृद्यातून का जात नाहीस उमगत नाही मला

माझी चिंता करु नकोस
मी तुझाच आहे, तुझाच राहील
फक्त उद्या-आज नाहीतर, चिरकाल
श्वासांच्याही पलीकडे, काळाच्याही पलीकडे
फक्त तुझाच, फक्त तुझाच


-आशापुञ

केदार मेहेंदळे



Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]