झाड (लिमेरिक)

Started by प्रशांत नागरगोजे, January 20, 2013, 02:03:02 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

हिरव्या जमिनीवर झाड एक सुकलेलं
पाण्याला नाही,प्रेमाला ते मुकलेलं
कोणाचीतरी वाट पाहतय
दिनरात त्याला शोधतय
खोडावर त्याचंच नाव कोरलेलं


-आशापुञ

Meera Eela

कोरलेल्या नावात  दडलेल्या  आठवणी
सुकलेल्या  पानात भिजल्या आठवणी ..
दिसामासांनी जुनं  झालं माणुस
क्षणाक्षणानी नव्या  झाल्या आठवणी ...  :)

प्रशांत नागरगोजे

@nehaspatahk: khu chan lihil ahe tumhi...awadal.