माझे नशीब

Started by amoul, January 20, 2013, 05:23:31 PM

Previous topic - Next topic

amoul

ठरवले होते जे ते राहून गेले बरेचसे,
तेव्हा वेळ नव्हता आज वेळ नाही,
उत्साहाचे रोपटेही मावळले बरेचसे.

दिशाच बदलून गेल्या चालतांना बऱ्याचदा,
पाठीत नसत बळ छातीत झेलली कळ,
मी विरोधही ना केला नियतीला बऱ्याचदा.

तरी मी नशीबवान आहे इतरापेक्षा बऱ्यापैकी,
काहींचे हरवले किनारे काहींच्या बुडाल्या नौका,
निदान मी एकाकी बेटावरतरी जगतोय बऱ्यापैकी

..........अमोल

santoshi.world



केदार मेहेंदळे

kya bat..... shevatch kadav vishesh avadal