वाटसरू

Started by amoul, January 20, 2013, 05:27:51 PM

Previous topic - Next topic

amoul

तिने मेघ सरकवले,
तिच्या आभाळावरुनी.
त्याचे वस्त्र मातीत लोळे,
त्यांचे भगवेपण सरुनी.

तिची नितळ निळाई,
तो पाहणारा पहिला.
तोही सागर स्पर्शाचा,
नव्याने झाला ओला.

आकाश जळ एक झाले,
क्षितिजाचे सरले अंतर.
तिने मेघ पुन्हा पांघरले,
तो जपत गेला ओंकार.   

..........अमोल

केदार मेहेंदळे

far chan kavita..... rupatmk shrungarik kavita... avadali