परत आली माझी चिठ्ठी

Started by केदार मेहेंदळे, January 22, 2013, 01:38:35 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

परत आली माझी चिठ्ठी
तुला लिहिलेली......................................

......................................नाव तर तुझच होतं पण
......................................पत्ता माझा लिहिला होता
......................................माझ्या बरोबर नाहीयेस आता
......................................ह्याचा विसरच पडला होता

हे पण ठीकच झालं
चिठ्ठी मिळाली नाही तुला......................................

......................................जुन्या आठवणी लिहिल्या होत्या
......................................त्या कागदाच्या तुकड्यावर
......................................वाचून रडली असतीस, आली असतीस
......................................सोडून सगळं वार्यावर

किंवा असं हि झालं असतं
तू उत्तरच दिलं नसतं......................................

......................................नकोच आहेत तुला
......................................आठवणी त्या जुन्या
......................................समजलं असतं हे अन
......................................उगाच दुखावलो असतो

म्हणूनच तर लिहिला होता
चिठ्ठीवर पत्ता स्वताहाचा......................................

......................................ना तू चिठ्ठी वाचली
......................................ना कसली अपेक्षा राहिली
......................................परत आली माझी चिठ्ठी
......................................तुला लिहिलेली


केदार..

Shrikant R. Deshmane

नकोच आहेत तुला
आठवणी त्या जुन्या
समजलं असतं हे अन
उगाच दुखावलो असतो

म्हणूनच तर लिहिला होता
चिठ्ठीवर पत्ता स्वताहाचा

ना तू चिठ्ठी वाचली
ना कसली अपेक्षा राहिली

kya bat hay kedarji...
apratim aahe..
vichar patle kaviteche...
thnks...
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]


स्वामीप्रसाद

खुपच छान कविता केदारजी...!
अप्रतिम....!!!!


Preetiii

जुन्या आठवणी लिहिल्या होत्या
......................................त्या कागदाच्या तुकड्यावर
......................................वाचून रडली असतीस, आली असतीस
......................................सोडून सगळं वार्यावर

He asa kadhi kadhi hot nahi...

भावना आहेत पण शब्द नाहीत,

कधी शब्द आहेत तर उत्तर नाहीत,

वेळ होती तेव्हा उत्तर नव्हते

आज उत्तर आहे पण वेळ निघून गेलीये



उडत्या पाखरांचे पंख छातल्यावर  त्याचा दुखः पंचांगात मिळत नाही

कापलेला पतंग उडत नाही पुन्हा पहिल्यासारखा

जरी मांजा लावला दुसरा तरी

he asa uttar milata

swara



Ankush S. Navghare, Palghar