दिन किती झाले आज

Started by Sadhanaa, January 23, 2013, 07:25:21 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

दिन किती झाले आज
   सोडून सखी गेल्याला
स्वप्नांमध्ये कायम माझ्या
  येते ती क्षणा क्षणाला ।
येते जरी स्वप्नामध्ये
   दूर दूर ती रहाते
उघडतांच नेत्र माझे
  अंधारांत निघून जाते ।
मिटल्या नेत्री येऊन ती
   झोंपल्या स्मृति चाळवते
आठवितो स्मृति जेव्हां
   अंधारांत ती विलीन होते ।
लपंडाव क्रूर असा हा
   मज संगे ती का खेळते
स्वप्नांत अन् स्मृतिमध्ये
   कायम कां न बैसते ।।रविंद्र बेंद्रे

ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_11.html

Ankush S. Navghare, Palghar

दिन किती झाले आज
   सोडून सखी गेल्याला
स्वप्नांमध्ये कायम माझ्या
  येते ती क्षणा क्षणाला ।

Sadhnaji khup chan kavita ahe.



Sadhanaa

Thank you....Ravindra Bendrey is no more...I am sadhana his daughter who is Publishing his poems on his behalf...
but still
thank you...
Sadhana

Ankush S. Navghare, Palghar

#5
Sadhana ji mi ravindra jinchya kavita hya adhihi vachlya ahet. Pratibha hi raktatunach vahat asate. Tyamule kavita tyani lihilya kay an tumhi lihilya kay kahich farak padat nahi. Asha darjedar kavita amhala vachayla milatat he amache bhagyach ahe. Ani he is forever karan tyanchya kavitani tyana amar kele ahe.
Regards...

Sadhanaa

Thank you so much....
मी माझ्या पपांचे नाव खूप दिवसांनी ...कोणीतरी त्यांना रवि असे अनुबोधले ,वाचून खूप छान वाटले ,त्यांना त्यांचे मित्र रवी ह्याच नावाने बोलवत असत.त्यामुळे आठवण ताजी झाली आणि त्या सर्वांची सुद्धा मला आठवण आली जे त्यांना बोलवत होते... म्हणून  मी ते उत्तर दिले.
nothing more ...
still thank you so much.....
Sadhana


Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Abhijeet.Kshirsagar