घरी कुणीतरीआपली वाट पाहत असते...

Started by Ankush S. Navghare, Palghar, January 23, 2013, 11:13:25 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

प्रवासातले दोन क्षण
कसे येतात कसे जातात
कधी सुखाचा तर
कधी दुखाचा संदेश देतात
ह्या स्टेशनवरून त्या स्टेशनवर
गाड्या येतात जातात
कितीतरी माणसे आपली
घराची वाट धरतात
गर्दी वाढतच असते
घाई होतच असते
पण विसारु नये की
घरी कुणीतरी
आपली वाट पाहत असते
एक गाडी चुकली तर
फरक पडत नाही
पण जीवनाची वेळ चुकली तर
पुनः जीवन मिळत नाही
म्हणून गाडीत चढताना
थोडा विचार करावा
घरच्यांना आठवूनच
नेहमी प्रवास करावा
नेहमी प्रवास करावा...

... प्राजुन्कुश
... Prajunkush


केदार मेहेंदळे



Ankush S. Navghare, Palghar