गझल - शेतकरी.

Started by pravinpagar, January 24, 2013, 12:18:20 PM

Previous topic - Next topic

pravinpagar

शेतकरी......

नाम होठी विठ्ठलाचे, आणि हाती टाळ आहे
काय गाऊ गीत त्याचे, कोरडा हा माळ आहे.

घाम गाळे बाप आई, डोलणारे पीक येते
पीक तेही नासवीतो, तो असा नाठाळ आहे.

सोडवावे मी कसे हे, शब्दकोडे जीवनाचे
वावरी हा रुतलेला, कर्जरूपी फाळ आहे.

मोगलाई ठोकशाही, एक तोही काळ होता
आजची ही लोकशाही, का तरी आबाळ आहे.

थांबवा ती भाषणे नी, घोष सारे संस्कृतीचे
आजही पोटात माझ्या, पेटलेला जाळ आहे.

- प्रविण पगार, नाशिक

GANESH911

pravin khupach chan lihilat,pudhil lekhanas shubhechaa

केदार मेहेंदळे

khupach chan.... asha vishayaavar gajhal ..... chan lihiliy.

pravinpagar


khupach chan.... asha vishayaavar gajhal ..... chan lihiliy.


धन्यवाद केदारजी


Ankush S. Navghare, Palghar

Pravin ji aajachya shetkaryache manogat tumhi prabhavipane mandaley. Khup chan..
Regards..

pravinpagar


amoul