क्षण भर तरी ........

Started by SANJAY M NIKUMBH, January 24, 2013, 09:53:41 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

क्षण भर तरी ........

क्षण भर तरी

तू मला

माझा होऊन

जगू देशील कां ?

एकदा तरी

हे जग

माझ्या डोळ्यानं

पाहू देशील कां ?

गंध कसा

माझ्या श्वासाचा

मला तू

कळू देशील कां ?

स्वप्नात तरी

माझा चेहरा

एकदा मला

बघू देशील कां ?

किती जन्माची

साथ तुझी

हे गुपीत मला

सांगशील कां ?

तू हि जगतेय

धुंदीत माझ्या

अबोल पाकळ्या

तुझ्या खोलशील कां ?

संजय एम निकुंभ , वसई

दि. ०७.०१.२०१३ वेळ : ८.०० रा.

केदार मेहेंदळे



मिलिंद कुंभारे