तिची अन त्याची पहिलीच भेट

Started by Rupesh Naik, January 25, 2013, 12:37:01 PM

Previous topic - Next topic

Rupesh Naik

"आज तरी उशीर होऊ नये" गर्दीतून वाट काढत सेकंद काट्यावर लक्ष राखून कंपनीची बस पकडायची रोजचीच सवय, पण आज जरा खास आहे ना .. तिची अन् त्याची पहिलीच गाठ आहे ना ..
      तसा तो चालतच जातो पण आज Taxi केली. पाहिलं इम्प्रेशन चांगल राखण्याची थोडीफार शिकस्त केली इच्छितस्थळी पोहोचल्यावर त्याने नजर चौफेर फिरवली. प्रत्येक चेहरा त्याला साद घालत होता अन् ती असल्याचा भास करून देत होता. तेवढ्यात पाठीवळ हळुवार थाप पडली. पहिल्यांदाच दोन अनोळखी नजरांची भेट झाली. पण का कुणास ठाऊक तिला त्या नजरेत एक ओढ दिसली. दोघे भानावर आले तेव्हां त्याने हाथ पुढे केला.
"Hello.."
तिने संस्काराचा पाठ पढवत नमस्कार केला. चाचपत यानेही दोन हाथ जोडले. हाथ मिळणे जर एवढे कठीण तर हृदय मिळणे किती असेल याचे गणित केले.
      त्याने coffeeshopकडे हाथ दाखवला. ती देखील त्याने दाखवलेल्या मार्गापथावर चालू लागली. त्याने Corner table with two chair निवडल. मोकळेपणाने बोलू शकतो अस तिलाही समजावलं.
त्याने तिच्यासाठी खुर्ची मागे सरसावली तर तिने स्वतःची खुर्ची स्वतः निवडून Independent असल्याची समज घातली. दोघांनी स्थानग्रहण केले.
Coffeeचा मंद सुगंध दरवळत होता. गिटारच्या तारा मंद सूर छेडत होत्या. टेबलावरील एकाच गुलाब मIन डोकाऊन पाहत होता. तिच्या सौंदर्यावर कदाचित तो देखील भुलला होता. वाद्यांच्या आवजाखेरीज बाकी सर्व शांत होते. सुरवात कोण करेल याची वाट पाहत होते. waiter देखील wait करून थकला.त्यानेच मग थोडा पुढाकार घेतला.
"Order Please"
"Cappachinno" दोघेही एकदम उद्गारले.                                                                                                    आवड जुळलेली पाहून गालातल्या गालात हसले. waiterचे काम संपले होते. दोघांना सूर गवसले होते.
शांत तो पण आहे
शांत ती पण आहे
दोघांच्या या भेटीतला
नाजुकसा हा क्षण आहे...


सुरवात कोठून करावी
पण बुद्धीचा कोठे ठाव आहे..
नजर कॉफ्फीवर असली तरी
मनाची भलतीकडेच धाव आहे..

तिच्या जशा पापण्या लवतात
हृदयाचे याचे ठोके चुकतात..
तिच्या लटांच्या हिंदोळ्यावर
बेफिकीर मग स्वेर झुलतात...    ([/size]क्रमशः)

काही क्षण असे असतात
जेव्हा शब्दांची गरज नसते...
नजरेच्या भाषेतच सगळं
मनातलं स्पष्ट उमगतं असतं...

ती कॉफी नुसतीच उकळत नव्हती
हृदयातही काहीसं खदखदत होतं
पहिलीच भेट असूनही
माहित नाही का, पण खूप आपलं वाटत होतं...

कपातील फेसावरून
भास होत होते भविष्याचे...
तिचं हास्य आणि त्याचं गोंधळलेपण
एक गूढ सुरावट गात होते...

एक क्षण होता — त्याचं "काहीतरी" बोलावं वाटत होतं
पण शब्दांइतकी ताकद त्या शांततेतच होती
मोकळं काहीच नव्हतं, पण ओझंही कुठेच नव्हतं
ती पहिली भेट, त्या दोघांमध्ये एक मिठीत विरघळत होती...

कॉफी संपली होती. वेळही निघून चालला होता.
पण दोघांच्या नजरेतील ते क्षण अजून थांबले होते. ती उठली. त्याने पुन्हा विचार केला —
"नको का विचारू... पुन्हा भेटशील का?" ती पर्सच्या बकलशी खेळत म्हणाली: "आज फार बोललो नाही... पण खूप समजलं असं वाटतंय."

त्याला काहीच बोलायचं नव्हतं आता. कारण त्याच्या मनाने केव्हाच तिच्या मनाशी हस्तांदोलन केलं होतं.
त्या भेटीला नाव नाही, पण अर्थ होता. ते नातं नव्हतं, पण एक नजाकत होती. ते "प्रेम" नव्हतं, पण प्रेमासारखं नक्कीच काहीतरी होतं...

ती पहिली भेट...
नंतर कितीही गोष्टी घडल्या, पण आठवणीत तीच पहिलीच जागा ठेवून गेली.
पहिल्या प्रेमासारखी... थोडी अबोल, थोडीच गोड, पण कायमची लक्षात राहणारी.........

MK ADMIN


Palande Vinod

Mitra, kharach chan story aaahe. hi story continue kar, pn end nako karus.............


Rupesh Naik

This is the newly added part — the story continues to unfold. Next part coming soon... ;D