झाड आणि वस्ती

Started by विक्रांत, January 26, 2013, 10:58:48 AM

Previous topic - Next topic

विक्रांत



एक सुंदर झाड होते.
उंचच उंच गर्द पानांचे
फळांनी लगडलेलं
किलबिल करणाऱ्या
पाखरांनी अन घरट्यांनी
अवघे भरून गेलेलं.
शिकारी प्राण्या पासून
खूप सुरक्षित असलेलं.
म्हणून मग
त्या झाडावर हळू हळू
नवीन पाखर येवू लागली
घरटी बांधून राहू लागली
सुरवातीला त्याचे कुणालाच
काही वाटले नाही
हळू हळू पण फांद्या
कमी पडू लागल्या
बेचक्या तर उरल्याच नाही .
तरीही झुंडी मागून झुंडी
पाखर येतच राहिली
एव्हाना त्या झाडाजवळ
येवून साप व्याधही
काही वावरू लागले
पण जगण्यासाठी ते झाड
खूपच सोयीस्कर होते
म्हणून ती पाखर तरीही
तिथेच राहू लागली
पण ते झाड आता
अस्ताव्यस्त दिसू लागले
जागा कमी पडू लागली
काही स्वार्थी पाखरांनी
बुंधा फांद्या टोकरून
नव्यांना जागा करून दिली
मोबदल्यात
भरपूर कीड खाल्ली .
त्यामुळे झाड खचू लागले
खुरटू लागले
ते पाहून झाडावरची
जुनी जाणती गोळा झाली
अन त्यांनी फर्मान काढले
सारी नवीन घरटी
तोडण्यात यावीत
खूप भांडण पाखरात
खूप लढाया झाल्या
अन शेवटी त्यावरही
एक तोडगा निघाला
अमुक काळा नंतरची
घरटी पाडण्यात यावीत
काडी काडी गोळा केलेलं
एकेक घरट मग
उध्वस्त होऊ लागलं
भरपावसात भिजलेली पिलं
पंखाखाली घेवून
पक्षीण आक्रोश करू लागली
कीड खावून फुगलेली पाखर
आपल्या उंच घरात
गुपचूप बसून राहिली
पावूस पडतच होता
मोडलेल्या घरट्यांची
काडीन काडी वाहवत होता

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/





केदार मेहेंदळे

विक्रांत,
सुंदर कविता लिहिली आहेस. थोडा शेवट वाढवतोय... बघ पटतो का?

ह्या सगळ्या गदारोळात
झाडाचा विचार झालाच नाही
सोसत न्हवता भार त्यालाही
हे कोणी पाहिलाच नाही

तुटलेली घरं बघून तरीही
झाड रडत उभं होतं
उरलेली घरं तुटू नयेत म्हणून
झाड कासोशिनी उभं  होतं

विक्रांत

केदार,
कवितेत झाड शहराच प्रतिक म्हणून वापरले आहे .घरटी  वस्ती . झाडाला म्हणजे शहराला व्यक्तिमत्व दिलेले नाही . ते तू दिले आहेस .मी फक्त पाखर अन घरटे ,अस्ताव्यस्त वाढणारी झोपडपट्टी अन अतिक्रमण शहरात येणारे लोंढे यावरच कविता केंद्रित केली होती. धन्यवाद .शहरालाही मन असते.

केदार मेहेंदळे

ho... mala te samajl hot. pan pratyek mothyaa shaharaachi hi hich kathaa ahe. jhiopadpattichaa vichar hoto pan shaharaachi kaay avasthaa aahe te koni vichaarat ghet naahi..

विक्रांत