साक्षात्कार

Started by swatium, January 26, 2013, 07:06:15 PM

Previous topic - Next topic

swatium

साक्षात्कार

नेहेमी वाटायचे
दहन वा दफ़ना पूर्वी
शिल्लक असते ते फक्त कलेवर
आत्मा तर केंव्हाच निघून गेलेला असतो
मग का असते
आपल्यांचे रडणे
कशासाठी असते अरण्यरुदन
कशासाठी असतो कलेवराचा
सजावट सोहोळा
पण आज
मला खरोखरच 'साक्षात्कार 'झाला
कारण आज ..मी बघितला
सार्यांच्या डोळ्यातला अतीव आदर
आपुलकीनी भारावलेले चेहेरे
सलामीसाठी सारे सज्ज होते
ती एका मेजरची
अंत्य् यात्रा होती
नव्हे त्याच्या देहाची
कारण ..त्याच देहाने तर
पराक्रम केला होता
अंगावर घाव झेलले होते
वार सोसले होते ..आपल्यांसाठी
म्हणूनच
तो सत्कार
ती सजावट
तो आदर
ते भारावलेपण
सारे होते त्या देहाच्या सन्मानार्थ
अर्थात आत्म्याला स्मरुन
अगदी तितकेच नाही
पण बरेचसे तसेच तर असते प्रत्येकाचे..
आयुष्य संग्रामाच्या बाबतीत
देहाला नाकारून चालत नाही
आणि आत्म्याशिवाय काहीच नाही
मुळा शिवाय वृक्ष नसतो
आणि नुसत्या मुळाना तरी
कोठे अर्थ असतो !

...स्वाती मेहेंदळे
(एक भिजले वाळवंट ..या कवितासंग्रहातू

केदार मेहेंदळे

मुळा शिवाय वृक्ष नसतोआणि नुसत्या मुळाना तरीकोठे अर्थ असतो !




far chan..... kavita avadali