तुझा चंद्र

Started by satish-Aman, January 26, 2013, 10:57:37 PM

Previous topic - Next topic

satish-Aman

समजुन घेतले मीच मला ,
पुन्हा भेटलो, मीच मला .

ढग एक गहीवरला होता पुन्हा ,
क्षण एक होता, तो एक जुना .

गुंफले दुंखाला हि शब्दात माझ्या ,
लोकानीच दाखवली, हि रीत मला . 

सर्व काही सांगितले बेफान वाऱ्याने ,
उधळलेली काही फुले, परत केली मला .

झंकार तुझे विरले आसमंतात ,
साद घालती, चित्तवेधी मला .

चंद्र आभाळात होता तुझा ,
काही वाटले, चांदणेही मला .

केदार मेहेंदळे

Satish,


Khup chan kavita....ekhadya gajhal sarakhi :)

satish-Aman

आभारी आहे केदार साहेब , हि गझलच आहे.
पण मला गझल चा विभाग ह्या फोरम मध्ये कुढे  दिसला नाही .
शेवटी मग इथेच पोस्त केले.