ताजमहाल

Started by Sadhanaa, January 27, 2013, 09:27:44 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

जावे कशास मज वाटे 
ताजमहाल पाहण्याला
गमन कारण व्यर्थ भासे
गरिबांचे  श्रीमंती स्थानाला|

मृत राजांच्या थडग्यावरती 
जन फिदा होऊनी जाती
परी गरिबांची घरटी   
त्यांच्या नजरेला सलत रहाती |

बांधली कबर शहाजहानने 
मदत घेउनी दौलतीची
अन वंचना केली त्याने 
गरिबांच्या उत्कट प्रीतीची |

बांधली कबर ज्यांनी 
त्यांची आठवण कुणा येते
कि न त्यांचाही हृदयी 
जाज्वल्य असे प्रेम होते?

रोज जळती दीप अनेक 
राजशाही त्या कबरीत
पेटवीता का कधी कोणी   
पणतीत गरिबांच्या झोपडीत |

विपरीत असा न्याय हा   
जगामध्ये का दिसावा
थडग्यास  वैभव श्रीमंताच्या अन 
गरिबास उपहास मिळावा |

समाज रीतीचे उफाराव्या 
ह्या  कारण एकच दिसे वास्तव
नव्हती दौलत त्यांच्या पाशी 
प्रेममंदीर ते उभारण्यास्तव ||
रविंद्र बेंद्रे
You can watch Video
Please click here...
http://www.kaviravi.com/2013/01/video-read-by-deepali-jadhav.html

Ankush S. Navghare, Palghar

Sadhnaji outstanding kavita ahe. Sagale divach baghatat pan divyakhalcha andhar kunihi pahat nahi jo hya kavitetun prakharpane janavato.

Regards..