देवा सावर रे आता मला

Started by सौमित्र देसाई, January 27, 2013, 11:41:53 AM

Previous topic - Next topic

सौमित्र देसाई

देवा सावर रे आता मला
आठवात हरवण्यापासुन
आठवात हरवुन
स्वत:त गुरफटण्यापासुन
कारण पुन्हा गुरफटलो जर का मी
तर तुलाही विसरेन
तुलाही विसरलो तर
मग मला कोण वाचवेल
म्हणुन
देवा सावर रे मला आता

सावर पुन्हा रडण्यापासुन
रडुन मग पुन्हा
काळीज सुकवण्यापासुन
कारण पुन्हा मी काळीज सुकवेल
काळीज सुकवल तर
हृदयाला ही विसरेन
अन हृदयाला विसरलो तर
मला कोण जगवेल
म्हणुन
देवा सावर रे मला आता

सावर पुन्हा कविता करण्यापासुन
कविता करताना
शब्दात गुंतण्यापासुन
कारण गुंतलो जर का मी पुन्हा शब्दात
तर स्वत:लाही विसरेन
अन स्वत:लाच विसरलो तर
माझ्याशिवाय
तुला रे कोण आठवेन
म्हणुन म्हणतो
देवा सावर रे मला आता
सावर रे आता.....॥

शब्द-सौमित्र देसाई

केदार मेहेंदळे