बदल

Started by Mangesh Kocharekar, January 29, 2013, 03:19:23 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

  बदल

इथे नसे कुणाचा घरबंध वागण्याला

उरतो न अर्थ आत्ता सत्य बोलण्याला
     साधेपणास  आत्ता न चलनात माप आहे
    तुम्ही नसाल  मोठे परी भाप्क्यास धाक आहे
पायात पायताणे पिशवी काखेत असता
रामा  गडी अडाणी त्यांना तुम्ही दिसता
     सिगर तोंडी असुद्या इअर फोन कानी
     किस्सा असो रिकामा म्हणतील हाय जानी
डोळ्यास धाप्ने जे सोनेरी रंग असता
केसात जेल मेहेंदी तुम्ही अमीर दिसता
    खुंट वाढलेली अन रुक्ष गंभीर चेहरा
    तत्वज्ञ असाल तुम्ही परी उठतील समोर  नजरा
गालावरी लकाकी कपड्यात शान आहे
वाढे रुबाब तुमचा भ्रमास मान  आहे
   नजरेत हसून थोडे तुम्ही म्हणाल ह्यालो
  तुमच्या अदेस भुलूनी म्हणतील साहेब बोलो
     बदल जरूर व्हावा न पटो जरी मनाला
    अथवा नोरोप घ्यावा न अर्थ सांगण्याला
                  कोचरेकरमंगेश
       

केदार मेहेंदळे


amoul