उशीर.

Started by pralhad.dudhal, January 29, 2013, 04:54:42 PM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal

उशीर.
आर्त विनवणी तुझी, अचानक स्मरून गेली.
नकळत आसवांची, सर एक झरून गेली.

नाकारले तुला, वागणे माझे मतलबी होते,
अंतरात ती जखम, ओली एक उरून गेली.

चोखाळतोय मी वाट, आता  काटाकुट्यांची,
मखमली चांदणी रात, केव्हांच सरून गेली.

बेफाम बेलगाम ती, जवानीची होती नशा ,
अघोरी लालसा ती, स्वप्ने कुस्करून गेली.

जगणे आता व्यर्थ, आणि मरण अनर्थ आहे,
अचेतन देह सारा, आकांक्षा मरून गेली.
              ......................प्रल्हाद दुधाळ.
                   ........काही असे काही तसे!
www.dudhalpralhad.blogspot.com

Mandar Bapat


केदार मेहेंदळे



amoul


pralhad.dudhal


Madhura Kulkarni

गझलेचा आशय आवडला.
पण, गझलेत 'मात्रा' मोजाव्या लागतात.
तुम्ही 'लघु-गुरु' मोजल्यास तुमच्या गझलेत 'मात्रा' कमी-जास्त झालेल्या आढळून येतील.
असो, प्रयत्न खूप चांगला होता. गझलेचा अर्थ तर खूपच मस्त. पुढील लेखनास शुभेच्छा!