रस्ते आणि विचार

Started by केदार मेहेंदळे, January 31, 2013, 10:51:02 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मी खूप विचारात असलो की
चालत रहातो रस्त्यावर
...........................................रस्त्याला रस्ते मिळत जातात अन
...........................................विचारांतून नवे विचार येत जातात

मी चालून चालून थकलो की
स्तब्ध उभा रहातो रस्त्यावर
...........................................रस्ता तरीही संपलेला नसतो अन
...........................................विचार तरीही चालूच असतात.


केदार...

amoul

agadi khar.......... rasta hi sampat nahi.... vicharhi.