निरपेक्ष असे राहुनि

Started by Sadhanaa, February 01, 2013, 10:31:24 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

निरपेक्ष असे राहुनि
भक्ति देवाची करावी
               देवास सांकडे घालण्याची 
न इच्छा मनीं धरावी ।
उपदेश हाच आजवरी 
जीवनांत ऐकत आलो
अल्पशा सामुग्रीने 
                 देव पूजा करू लागलो ।
माझी पूजा रुजुं झाली 
देवाजीच्या पायाशी
                हीच भावना सदा ठेवली 
जतन करून मनाशी ।
होता परिं हा आभास 
हे आता कळून आले
जीवनांत अनेक जेव्हां 
              अति भयंकर घांव सोसले ।
देवाचे खरे रहस्य 
मला जेव्हां उमजून आले
मनामध्ये वैफल्याचे 
              भाव सारे दाटून आले ।
देव भावाचा भुकेला 
हे वचन खोटे आहे
कली युगांतील देवाला 
             भक्ताकडून अपेक्षा आहे ।
कृष्ण- कृत्ये करूनही 
सुखासीन राहता येते
पूजेचे अवडंबर करून
          देवालाही फसविता येते ।
रीत ही देवपूजेची
आता मात्र कळून आली
निरपेक्ष भक्ती करून
         आयुष्याची माती झाली ।
लांच-लुचपतीने देवास
प्रसन्न करून घेता येते
देवाचीही अशा लोकांवर
        सदैव कृपा दृष्टी असते ।
देवाचीही रीत पाहून 
भक्ती फक्त आभास ठरला
पूजा आणि देवावरचा
      विश्वास मात्र पूर्ण उडला ।।   रविंद्र बेन्द्रे     
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/01/blog-post_23.html

केदार मेहेंदळे

khar aahe... ajubajula baghital ki kadhi kadhi aaplya shradhdhaa chukichyaa aahet ki kay as vatat. :(