गुपित आयुष्य जगण्याच......

Started by Shona1109, February 01, 2013, 11:15:06 AM

Previous topic - Next topic

Shona1109

बागेत फिरता फिरता.........
फुलावर बसलेलं एक फुलपाखरू माझ्याकडून बघून हसल
माझा हिरमुसलेला चेहरा पाहून सहजच विचारून गेल
"काय झाल? का एवढी उदास तू?"
मी बोलले, "रोजच्या आयुष्याचा आलाय कंटाळा
कारण जीवनात सुखापेक्षा दुखाचा डोंगरच मोठा
जगात मित्रांपेक्षा शत्रूच जास्त
प्रेमाच्या नावाखाली पैशाचा बाजारच खोटा
भूकंप, त्सुनामी, अतिरेकिनी मांडलाय खेळ
सगळ्याचबाबतीत विश्वास मरून गेलेला
तुझ बर मनसोक्त फिरता येत तुला
आयुष्य मनासारखं जगता येत तुला
ना कोणी ओरडणारा ना कोणी टोकनारा
ना कसला प्रश्न  ना कसली चिंता
फक्त फुलांवर उडायचं आणि मध पिऊन सुखात जगायचं"
आपले इवलेशे पंख फडफड ते हातावर येऊन बसल
अन बोलायला लागल..............,
"तुझ्या आयुष्यापेक्षा माझ आयुष्य वेगळच आहे
सात दिवसाच्या जीवनात मरणच जास्त आहे
जीव मुठीत घेऊन जगाव लागत
उद्याच मरण आजच बघाव लागत"
डोळ्यात त्याच्या अश्रू बघून माझेही डोळे पाणावले
अश्रू पुसण्यासाठी हात मी पुढे करताच
ते उडून जाऊ लागले पण
अन बोलल,
"चार दिवसांच्या  क्षणांना हसत हसत जग
समोर आलेल्या कुठल्याही संकटाशी लढता लढता मर
पण जाताना सगळ्यांच्या आयुष्यात सुखाचे रंग ठेवून जा"
जाता जाता आयुष्य जगण्याच गुपित सांगून ते गेल

....Shona



mkamat007