कीनारा

Started by केदार मेहेंदळे, February 01, 2013, 01:34:46 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

तुझ्या एका इशार्यावर आलेय
सोडून माझा कीनारा
.............................................नशिबाच्या वादळात एकतर
.............................................बुडेल प्रेमाची होडी ... किंवा...

जगीन स्वप्न तुझ्या सवे
गाठून तुझा कीनारा



केदार....

Madhura Kulkarni

वाह ! केदार दादा, कवितांच्या भेंड्या लावायच्या का?
कवितेतला एखादा शब्द पकडून पुढची छोटीशी कविता करायची.
आता माझ्या चार ओळी......

समुद्राच्या किनार्याची या निराळीच व्यथा
ओला चिंब हा सागर तरी  कोरडा किनारा
दुरावा त्या सागराशी कसा सोसवेल?
तळपतो उन्हामध्ये निराश बिचारा.

केदार मेहेंदळे

मधुरा
(तू मला केदार दादा म्हणाली आहेस. त्या मुळे मिळालेल्या दादा पणाच्या अधिकारांनी आणि माझ्या वाया मुळे मी नक्कीच तुला मधुरा म्हणू शकतो. ह्याला तुझी हरकत नसावी)

मजा येईल... माझा हि एक प्रयत्न


कोरडा जरी हा सागर किनारा
माहित त्यास हा क्षणाचा दुरावा
उसळता प्रेमाचे उधाण सागरी
भिजेल चिंब हा कोरडा किनारा

जरी लाटांचे त्यास बसती तडाखे
तरी पाहे वाट भरतीची किनारा
उसळता  लाट घेइ  कवेत तिला जसे
घेतले जणू कि कवेत प्रियेला.....  :)


आता पुढे काय?????????? :)

केदार.....

Madhura Kulkarni

ok...माझ्या ओळी,
भिजून गेला आसमंत सारा,
पाउस, वादळ, बेभान वारा

ओल्या ओल्या मातीचा दरवळे गंध
पिसारा फुलवून मोर नाचतो बेधुंद.

केदार मेहेंदळे

नाचताना फुलाला मोराचा पिसारा
निळा, जांभळा बेभान पसारा
...........................ओल्या आसमंती दरवळे प्रेम गंध
...........................मोरा बरोबर लांडोर नाचे बेधुंद


:) :) :) :) :)
आता?????????????

Madhura Kulkarni

निळा निळा घनश्याम
बासरी सुरेल वाजवे,
परतीच्या वाटेवर
जळती सांजदिवे

राधा आणि मीरा...
दोघी एकट्या अजुनी
वाट पाहत बसती
चेहरा सजवूनी.

केदार मेहेंदळे

#6
गोपिं सवे  खेळे
कृष्ण गोकुळात
राधेस हि भुलवे
वाजवून पावा गोड

सत्यभामे साठी लावे
पारिजातक अंगणी
जहाल विषप्याला
पाचवी मिरे साठी

भाव तिथे देव
प्रेम तिथे कृष्ण
कोणा वाटे तो साजन
कोणी म्हणे त्यला देव 


जमलय का?  ??? ??? ??? ??? ???

Madhura Kulkarni

हो केदार दादा, अगदी छान जमलंय.
ज्याचे त्यानेच ठरवावे
व्हायचे आहे कोण?
एकपत्नी राम कि,
दहा गोपिकांचा कृष्ण...

प्रत्येक देवाचे
असतात गुणदोष...
घ्यावे फक्त गुण
सारुनी बाजूला दोष.....