पुन्हा जगावे...

Started by Ankush S. Navghare, Palghar, February 03, 2013, 10:15:51 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

त्या दिवशी
त्या क्षणी
तुला भेटलो
त्या वेळी
मनात होते
परत निघालो
तुलान पाहताच
मागे फिरलो
मला वाटले
नाही भेटणार
फोन केला
नाही उचलणार
तरी वाटले
प्रयत्न करावे
दूरून गुपचूप
तुला पहावे
म्हणून आलो
जरा थांबलो
स्वप्नच ते
तूच आलीस
मला पाहून
गोड हसलीस
क्षणभर मौन
निशब्द सारे
तुझ्या समोर
अवसान गळाले
कळत नव्हते
काय करावे
काय बोलावे
कसे बोलावे
मनीचे भाव
तूच जाणले
तूच म्हटले
coffee घेणार??
मी करावे
तूच केलेस
बिल देखील
तूच दिलेस
समोर तु
फक्त तु
तुझ्या शिवाय
व्यर्थ मी
जीवन तु
फक्त तु
तुझ्या शिवाय
मर्त्य मी
वाटते मनी
हेच व्हावे
पुनः पुनः
तुला भेटावे
आयुष्य सारे
तुला वाहावे
ती वेळ
ते क्षण
पुन्हा जगावे
पुन्हा जगावे....

... अंकुश नवघरे
...Ankush Navghare

केदार मेहेंदळे

प्राजुन्कुश

apratim... sundar....don shabdaant mast bhavanaa mandlyaa aahet... :)

Ankush S. Navghare, Palghar

Kedar sir...
... Khup abhar agadi manapasun. Prayatna karun pahila.

kuldeep p


Ankush S. Navghare, Palghar

Prajdeep...
... Khup abhar agadi manapasun.


Ankush S. Navghare, Palghar

Sanjayji...
... Khup abhar agadu manapasun.

Pranay Chavan

Va!! Apratim  racaha.
समोर तु
फक्त तु
तुझ्या शिवाय
व्यर्थ मी
जीवन तु
फक्त तु
तुझ्या शिवाय
मर्त्य मी
Khup chan oli. Ata eka shabdat hi prayatna karun bagha jamatey ka.



Madhura Kulkarni

छान!
तिच्या शिवाय नाही जगण्या अर्थ आता
स्वार्थ कुठला, गाठला मी परमार्थ आता......