समाजानं नाकारलेलं एक वास्तव .....

Started by SANJAY M NIKUMBH, February 04, 2013, 03:00:35 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

समाजानं नाकारलेलं एक वास्तव .....

................................................................

खूप सारे लोक त्यांच्याकडे

तुच्छ नजरेने बघतात

समाजाला हि कीड लागलीय

असंही म्हणतात

त्यांचं जगच असतं वेगळं

असं समाज समजतो

या समाजाचा ते भागच नाही

असाच समज असतो

स्रियांना तर त्यांची

घृणाच वाटत असते

त्यांची सावलीही त्यांना

नको वाटत असते

पण खंर पहायला गेलं तर

त्यांच जग कुठे वेगळं असतं

माणसाच्या जगात माणसांशी

त्यांचही एक नातं असतं

त्याही असतात कुणाच्यातरी

मुली , अथवा बायकाही

भले त्या करतात धंदा

पोटासाठी शरीराचाही

या जग रहाटीत

त्यांनाही एक स्थान असतं

भले माणूस म्हणून त्यांना

मानाचं पानं नसतं

त्या असतात म्हणूनच तर

पुरुषांची तृष्णा भागविली जाते

इतर स्रियांना राजरोसपणे

कुठेही वावरता येते

कुणी हिनवो त्यांना वेश्या संबोधून

मी मात्र सलाम करतो त्यांनाही मनातून

कितीही म्हटलं तरी त्या समाजाचाच भाग आहेत

त्या आहेत म्हणून हा समाज आहे .

संजय एम निकुंभ , वसई

दि. ०४.०२.२०१३ वेळ : ७.३० स.