आठवणींत डुंबण्यात

Started by Sadhanaa, February 05, 2013, 12:10:42 PM

Previous topic - Next topic

Sadhanaa

आठवणींत  डुंबण्यात
आगळाच आनंद असतो
म्हणून त्यांना गोंजारण्याचा
मानवाला नाद असतो ।

प्रत्यक्ष घटने पेक्षा
आठवण ही मधुर असते
तशीच ती सत्या पेक्षा
अधिक भयानक असते
तरीही आठवणींचा हार
मनी गुंफला जातो ।

आठवण ही मित्र असते
प्रेमाने जवळ येते
तर कधी अचानक
मनापासून दूर सरते
अशावेळी माणूस तिचा
पाठलाग करत असतो

आठवणींची मालिका
जेव्हा मनी सुरु होते
त्याला कुठे अंत ना
काही सुरुवात असते
तरीही तिचा धागा
विणला जात असतो ।

आठवणी आहेत म्हणून
मनुष्य सुखी आहे
आठवणींच्या साह्याने
तो कायम जगत आहे
आठवणीचा महिमा हा
फार मोठा असतो ।

म्हणून त्यांना गोंजारण्याचा
मानवाला नाद असतो
आठवणीत डुंबण्यात,
आगळाच आनंद असतो ।।

                    रविंद्र बेंन्द्रे

कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this

http://www.kaviravi.com/2013/01/inspirational_27.html