स्मरू नको ,मजसी

Started by Mangesh Kocharekar, February 05, 2013, 02:53:30 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar

स्मरू नको ,मजसी


स्मरू नको भेट ती नको स्मरू दिवस तो

परी मनास सांग  तू रुसवा तुला का भावतो
       नको करू प्रेम तू नको गुंतू मज सवे
       एकांती घे सखे ह्या मनाचा ठाव तू
भेटीचा अन्वयार्थ काय तो स्मरू नको
जडवून जीव तू उदासवाणे हसू नको
      नको स्मरू खून गाठ नको स्मरू आपली भेट
      जिव्हारी लावूनी नको स्मरू आपली भेट
चंद्रमा चकोर भेट न घडे सखे  कधी नीट
न भेटण्यात पुन्हा पुन्हा असेल खचित तुझेच हित
      साहसी  विरह परी सांगतो तुला विकल्प
        न जल्मी या घडली भेटेन मी हा संकल्प
सांगू कसे तुला गडे मज साठी थांब तू ?
बोट माझी भरकटली त्यात जीव टांग  तू
        एक परी देतो वचन फिरुनी तुज भेटेन मी
         प्रेम  जे तू मला दिले या दुनियेस सांगेन मी     
                 मंगेश कोचरेकर

 

Ankush S. Navghare, Palghar

Mangesh ji khup chan shabdarachana ani shabda. Khup heart touching kavita ahe.

Madhura Kulkarni

मात्रा, शुद्धलेखन, अलंकार, शब्दकोष...कुठेच नाव ठेवायला जागा नाही......मस्त! खरच खूप दिवसांनी मस्त कविता वाचायला मिळाली.